spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Viral Video : साडी नेसून महिलांचा ‘हुतूतू’, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या महिलांचे किंवा खेळाडूंचे भन्नाट व्हिडीओ (Viral Video) पाहिले असतील. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराटचा विक्रम असो किंवा मग फुटबॉलपटूंचे थरारक गोल असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.

तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या महिलांचे किंवा खेळाडूंचे भन्नाट व्हिडीओ (Viral Video) पाहिले असतील. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराटचा विक्रम असो किंवा मग फुटबॉलपटूंचे थरारक गोल असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. तसेच महिलांचे देखील अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. अश्यातच आता महिला आणि खेळ असा दुहेरी संगम असलेला एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आपण मॅटवरील कबड्डी तुम्ही पाहिली असेल, पण मातीत साडी नेसून महिलांना कबड्डी खेळताना तुम्ही पाहिलं नसेल. मात्र साच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिलांना कबड्डी खेळताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही साडी नेसून कबड्डी खेळताना दिसत आहेत. इतकंच नाही तर आजूबाजूला उपस्थित नागरिक या महिलांना उत्साहाने प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन होत असल्याने नेटकरी खूपच प्रभावित झाले आहेत. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. विविधतेने नटलेल्या भारताचं जगभरात आकर्षण आहे. भारतातील संस्कृतीचं जगभरात विशेष आकर्षण आहे. यानेच प्रभावित होऊन जगभरातील पर्यटकही भारतात येत असतात. दरम्यान, मातीतील खेळातही भारतीय संस्कृतीचं सौंदर्य लाभल्याची प्रतिक्रिया काही नेटकरी व्यक्त करत आहेत.

साडी नेसून महिला कबड्डी खेळाताना पाहणं फारच खूप मनोरंजक आहे. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. छत्तीसगड ऑलिम्पिक स्पर्धेतील हा व्हायरल व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिला कबड्डी खेळत आहेत. या सामन्यात एक पंचही दिसत आहे आणि इतर गावकरी महिलांचा खेळ पाहून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

हे ही वाचा:

Thailand Day Care Attack: टुरिस्ट व्हिसावर रिपोर्टिंग केल्यामुळे CNN च्या पत्रकारांना थायलंडने केलं हद्दपार

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्यांची एन्ट्री

Happy Birthday Rekha : रेखासोबत सहकलाकाराने गैरवर्तन केल्या प्रकरणी बिग बी संतापले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss