spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्ही लठ्ठ आहात तर जाणून घ्या आजाराबद्दल माहिती

शरीर निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणामध्ये राहणे गरजेचे आहे. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे वजन नियंत्रण ठेवणे फार कठीण झाले. त्यामुळे अनेकजण लठ्ठपणाचा शिकार झाले आहे. वजन कमी करण्यासाठी भरपूर जण प्रयत्न करत असतात. पण काहीजणांनाच त्यामध्ये यश येते. पण काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. वजन जास्त प्रमाणात वाढल्यास आपण अनेक आजरांना निमंत्रण देतो. तसेच लठ्ठपणा हा एक गंभीर आजार आहे. त्यासाठी ते कोणते आजार आहे ते जाणून घ्या.

हे ही वाचा : घराचा प्रत्येक कोपरा सुगंधाने सुगंधित होईल, या टिप्ससह बनवा स्वतःचे एअर फ्रेशनर

 

लठ्ठपणा वाढल्यास तुम्हाला मधुमेह सारखा आजार होतो. आणि त्यामुळे तुमचे हात पाय सुजू शकतात.

स्त्रियांमध्ये वजन वाढल्याने हार्मोनल समस्या जास्त उद्भवतात त्यामुळे त्यांना मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मासिक पाळीमध्ये जास्त वेदना होऊ शकतात. या व्यतिरिक्त, वजन वाढल्यामुळे, बद्धकोष्ठता पुरुष आणि स्त्रियांमध्ये समस्या असू शकते. खराब जीवनशैलीमुळे, झोप पूर्ण होत नाही, झोपेच्या अभावामुळे, बद्धकोष्ठता होऊ शकते.

लठ्ठपणा वाढल्यास तुम्हाला उच्चरक्तदाब होऊ शकतो. आणि हायपरटेन्शनमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो.

 

जास्त प्रमाणात लठ्ठपणा वाढल्यास किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणा वाढल्यास किडनीच्या कायर्क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणा वाढल्यास किडनीला जास्त काम करावे लागते त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता जास्त असते.

लठ्ठपणा वाढल्यास पायांच्या शिरांवर दबाव येतो. जे हृदयाला रक्त आणण्याचे काम करते. वजन जास्त प्रमाणात वाढत असेल तर शिरांमधून रक्त चांगले जात नाही. हात पाय वगरे सुजतात.

जर तुम्हाला जास्त थकवा लागत असेल तर तुम्ही वजन तपासून बघा. वजन वाढल्यास आपल्याला जास्त प्रमाणात थकवा लागतो. थकवा लागल्यास आपल्याला ताजेतवाने वाटत नाही. आणि झोप देखील पूर्ण होत नाही. थकवा लागल्यास आपल्याला श्वास घेण्यास देखील त्रास होतो.

हे ही वाचा :

जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात साठवलेले किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

 

 

Latest Posts

Don't Miss