spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी शेलार पवार यांचं संयुक्त पॅनल

अवघ्या मुंबईचं लक्ष लागलेल्या एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या निवडणुकीची समीकरणं अचानक बदलली आहेत. कारण निवडणुकीत भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी युती केल्याचं नुकतंच जाहीर केलंय. खरं तर राजकीय शत्रुत्वाचा या निवडणुकांवर फारसा परिणाम होत नाही, मात्र सध्याचं धगधगतं राजकारण पाहता, ते कुठपर्यंत झिरपू शकतं, कुणाचे कुठे हितसंबंध गुंतलेले असू शकतात हे हा उत्सुकतेचा विषय ठरतोय. त्यामुळेच एमसीए निवडणुकीतलं हे चित्र सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसंच शिंदे गट असे सारे एकत्र येताना दिसणार आहेत. यावेळी आशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असून संयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले यांच्यासह ९ जण असणार आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे नेते यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलमधून निवडणुक लढवणार आहेत.

संदीप पाटील हे माघार घेणार नसल्याने शेलार आणि संदीप पाटील यांच्यात अध्यक्षपदाची निवडणूक रंगण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच २०११ मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटरवर भारी पडणार की संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे ही वाचा:

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात नाना पटोलेंनी दिले स्पष्टीकरण

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

ई-पीक पाहणी, सातबाराही ऑनलाईन असताना पुन्हा ऑनलाईन नोंदणीची सक्ती कशासाठी ?; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss