नुसतं भूत असं नावही काढलं तर भल्याभल्यांची बोलती बंद होते.काही जणांच्या तोंडून तर हनुमान चाळीसाचं निघते. भूताचे अनेक किस्सेही तुम्ही ऐकले असतील पण तुम्हाला जर हसवणार भूत दाखवलं तर…. बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’या चित्रपटाच्या माध्यामातून तुम्हाला हे अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकतात प्रदर्शित झाला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत ‘फोन भूत’च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘फोन भूत’ (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज ‘फोन भूत’चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.
‘फोन भूत’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची कथा एका दुकानाभोवती विणली गेली आहे, जिथे भूत-प्रेत यांना कैद करण्याचे सामना विकले जाते. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मोशन पोस्टरच्या सुरुवातीला इशान खट्टर खांद्यावर सांगाडा घेऊन दिसत आहे. यानंतर सिद्धांत आणि कतरिना देखील ईशान खट्टरसोबत बसलेले दिसत आहेत. ब्लॅक आउटफिटमध्ये कतरिना एखाद्या तांत्रिकाप्रमाणे भासत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
दर्शकांसाठी हा ट्रेलर खरोखरच अनोखा असून, यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर भूत शिकारीचा विशिष्ट भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर जेव्हा जगातील सर्वात सुंदर भूत कतरिना कैफला भेटतात तेव्हा एक भयकारी प्रवास सुरु होतो. ट्रेलरमधील धम्माल पाहताना प्रेक्षकांना एकीकडे कतरिना स्वतःची खिल्ली उडवताना दिसते आणि दुसरीकडे अनेक भयानक अनुभवांदरम्यान देखील हसू येईल. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हे ही वाचा:
Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात नाना पटोलेंनी दिले स्पष्टीकरण
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.