spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल – अनिल परब

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता याच जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक सोबत मिळून लढवणार आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता याच जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक सोबत मिळून लढवणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले आहेत की, ”अंधरेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येणार.”

आज शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल हे स्पष्ट केले आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक हि जाहीर करण्यात आली असून हि निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे असे देखील अनिल परब म्हणाले आहेत. अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल असे देखील अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी काँग्रेसचे नेते नाना पाटोले , भाई जगताप , अमित देशमुख या सर्व नेते मंडळींनी उद्धव ठाकरे याना भेटून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे . निवडणूकीसाठी गुरुवारी १३ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेले. आणि ३ तारखेला होणारी पोटनिवडणूक हि महाविकास आघाडीच्या वतीने लढली जाईल असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह कधी मिळणार? याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता परब म्हणाले आहेत की, अद्याप निवडणूक चिन्हांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आम्ही देखील याची वाट पाहत आहोत. अर्ज भरण्याची तारखी जवळ आली आहे. यामुळे आम्हाला त्याअगोदर चिन्ह मिळावं, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला चिन्हासाठी तीन पर्याय सुचवले आहेत. यावर ते म्हणाले की, आम्ही सुचवलेल्या तीन पर्यायांपैकी निवडणूक आयोगाला कुठलाही आक्षेप नसला, तसेच तेच चिन्ह दुसरं कोणी मागितलं नसेल. तर आम्ही निवडणूक आयोगाच्या अनुक्रमानुसार आम्ही चिन्ह सुचवलं आहे. त्यातलं नंबर एकचं त्यांनी आम्हाला द्यावा, असं ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

Viral Video : ‘मेरी तो वाट लगी पड़ी हे…’ उर्फी जावेदला कशाची चिंता आहे?

… भाजपला मजबूत होण्याची संधी आहे : एकनाथ खडसे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss