Tuesday, October 1, 2024

Latest Posts

निवडणूक आयोगाने का नाकारले दोन्ही गटांना हवे असणारे उगवत्या सूर्याचे चिन्ह, मोठं कारण आलं समोर

ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. तर, ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदेगट आणि ठाकरेगट यांच्यातील काहीनाकाही वाद हा सतत समोर येत होता. सुरुवातीला शिंदेगटाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर नंतर चिन्हावर आणि नावावर आपला हक्क सांगितला मात्र हा चिन्ह आणि नावावरून शिंदेगट आणि ठाकरेगटात सुरू असणारा वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा मात्र शिवसेना नाव आणि शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

त्यानंतर येणाऱ्या निवडणुका शिंदे आणि ठाकरे गटाला लढवता याव्यात म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर नवे नाव आणि चिन्ह निवडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. तर, ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. शिंदे गटाला चिन्हांसाठी पर्याय सादर करण्यास सांगितलं आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने सादर केलेल्या पर्यायांमध्ये उगवता सूर्य हे चिन्हही देण्यात आलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना हे चिन्ह देण्यास नकार दिला आहे. पण आता त्यामागे असणारं एक मोठं कारण आता समोर आलं आहे.

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मशाल, त्रिशुळ आणि उगवता सूर्य हे चिन्हांचे पर्याय मांडले होतं. तर, शिंदे गटाकडून ठाकरेंप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली. तर तिसरा पर्याय म्हणून गदा हे चिन्ह दिलं. मात्र, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांच्या पर्यायातून उगवता सूर्य हे चिन्हंच वगळलं. त्यामुळे दोन्ही गटांना उगवता सूर्य हे चिन्ह मिळालेलं नाही.

यामागील अजून एक कारण म्हणजे देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला एक निवडणूक चिन्ह देण्यात येतं. ते चिन्ह पुन्हा कुठल्या पक्षाला देता येत नाही. तर उगवता सूर्य हे दक्षिण भारतातील म्हणजेच तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजेच द्रमूक या राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह हे डोंगरांमागून उगवणारा सूर्य आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह नाकारलं आहे.

हे ही वाचा:

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

उद्धव ठाकरे गटाची नावावर आणि चिन्हावर प्रतिक्रिया; उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss