spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shrikant Shinde : पक्षाच्या नव्या नावासह ‘वाघाचा’ फोटो, श्रीकांत शिंदे यांचं ट्विट

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने काल याबद्दलचा निर्णय दिला आहे. या सर्व पार्शवभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाचं नवं आणि एक फोटो ट्विटर या सोशल मीडियावर अपडेट केला आहे.

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आणि हे नाव अधोरेखित करताना शिंदे गटानं शिवसेनेची ओळख असलेलं डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रंही नव्या नावासह प्रसिद्ध केलंय. शिंदे गटाला अजून कोणतीही निशाणी मिळालेली नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाचं नवं नाव एका पोस्टरद्वारे ट्विट केलंय. तसेच श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर च्या प्रोफाईल ला हे फोटो लावला आहे. त्यात बाळासाहेबांची शिवसेना या नावाबरोबरच शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रं आहे. या चित्रावरूनही दोन्ही गटांत वाद रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तर शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.

हे ही वाचा :

Amitabh Bachchan Birthday: ‘बिग बी’ यांच्या वाढदिवसानिम्मित चाहत्यांचा ‘जलसा’ बाहेर जल्लोष

संतप्त बेस्ट बस कंडक्टरचे आज आंदोलन, ‘या’ निर्णयाचा केला विरोध

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss