spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान मिळणार?, सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे (Chief Justice of India) म्हणून भारताचे ५० वे सरन्यायाधीश असतील. आताचे सरन्यायाधीश यू यू लळित यांनी आज चंद्रचूड यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून सरकारला पाठवले. न्यायमूर्ती ललित पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. CJI लळित यांनी आज सकाळी १०.१५ वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना जजेस लाउंजमध्ये आमंत्रित केले आहे. यामध्ये त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती दिली. केंद्र सरकारच्या वतीने कायदा मंत्रालयाने CJI लळित यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस पाठवण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : 

Aadhar Card : आधार कार्डचे किती प्रकार आहेत? ,जाणून घ्या प्रत्येक कार्डची खास वैशिष्ट्ये

विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती. नियमांनुसार, सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी भावी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येते.

कोण आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

IND vs SA: आज भारत-दक्षिण आफ्रिका निर्णायक सामना रंगणार, पावसामुळे लढत विस्कळीत होईल का?

१९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगला ‘या’ ३ नव्या चिन्हांचा प्रस्ताव

Latest Posts

Don't Miss