spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Palghar Case : राज्य सरकारचा निर्णय, साधू हत्याकांड प्रकरणी तपास आता CBI करणार

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्यानं भाजपकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

पालघरमधील या हत्याकांडानंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळ राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मविआ काळात घडलेल्या या घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून वेळोवेळी केली जात होती. अखेर सत्तातरानंतर या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविला जाणार आहे.

याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आलं आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिंदे सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss