Tuesday, September 24, 2024

Latest Posts

Keral: अंधश्रद्धेपोटी डॉक्टर दाम्पत्याने दिला दोन महिलांचा बळी, भयानक घटनेचा पोलिसांनी केला खुलासा

काही तस्करांना डॉक्टर दाम्पत्याचे ब्रेनवॉश करून मोठी रक्कम उकळायची होती, असे सांगितले जात आहे. बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून तस्कराने डॉक्टर दाम्पत्याचे ब्रेनवॉश केले.

केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील एलांथूर गावात एका डॉक्टर दाम्पत्याने अंधश्रद्धेतून दोन निष्पाप महिलांचा बळी दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दोन्ही महिला जून आणि सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यांच्या बेपत्ता प्रकरणांच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांना ‘मानव बलिदान’ची माहिती मिळाली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांना माहिती देताना कोची शहराचे पोलिस आयुक्त सीएच नागराजू म्हणाले की, दोन्ही महिलांची हत्या मानवी बलिदान विधी अंतर्गत झाल्याचा आम्हाला संशय आहे. महिलांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्यांचे मृतदेह पथनामथिट्टा येथील एलांथुर येथे पुरण्यात आले. सध्या फक्त एकाच महिलेचा मृतदेह सापडला आहे.

या प्रकरणी मूळचा तिरुवल्लाचा रहिवासी असलेला डॉक्टर भागवत, त्याची पत्नी लीला आणि मानवी तस्कर शिहाब हा मूळचा पेरुम्बावूरचा रहिवासी असून, मानवी बळी दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे . या दोन महिलांचा बळी देण्यामागील कारण अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जात आहे, ज्यात या दाम्पत्याला सांगण्यात आले होते की, डॉक्टर जोडप्याने दोन महिलांचा बळी दिल्यास येणाऱ्या काळात त्यांना भरपूर पैसा मिळेल. संपत्ती आणि समृद्धी वाढेल.

काही तस्करांना डॉक्टर दाम्पत्याचे ब्रेनवॉश करून मोठी रक्कम उकळायची होती, असे सांगितले जात आहे. बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून तस्कराने डॉक्टर दाम्पत्याचे ब्रेनवॉश केले. हा बळी दिला तर जीवनात भरपूर लाभ आणि पैसा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी डॉक्टरांना दिली. यानंतर एका महिलेला कलाडी येथून तिरुवल्ला येथे नेण्यात आले. यानंतर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. त्याच वेळी, २७ सप्टेंबर रोजी पोन्नुरुन्नी येथील रहिवासी असलेल्या आणखी एका महिलेला कडवंतारा येथून तिरुवल्ला येथे नेण्यात आले. या महिलेचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासल्यानंतर पोलीस तिरुवल्ला येथे पोहोचले होते.

हे ही वाचा:

विप्रोने ३०० “मूनलाइटर्स” कसे पकडले? विप्रोची थिअरी होतेय ट्विटरवर व्हायरल

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ९ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचणार, शरद पवारांकडून स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss