Tuesday, October 1, 2024

Latest Posts

शिंदे – भाजप सरकारचा अजब निर्णय, सभेत काळया कपड्यांवर घातली बंदी

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काळ्या रंगावर आणि काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूवर बंदी घालण्यात आल्याचे समजत आहे आणि त्यामुळे त्याच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेतून बाहेर पडून शिंदेगटाने भाजपसोबत नवीन सत्ता स्थापन केली. सत्ताविस्तारानंतर शिंदे- फडणवीस सरकार अनेक नवे नियम, निर्णय घेताना, जुन्या निर्णयांमध्ये काही बदल करताना दिसत आहे. दरम्यान, शिंदे सरकारने घेतलेला असाच अजब निर्णय सध्या चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काळ्या रंगावर आणि काळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूवर बंदी घालण्यात आल्याचे समजत आहे आणि त्यामुळे त्याच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात काळे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतकचे नव्हे तर, काळा रुमाल, काळा पेन घेऊन येणाऱ्यांवरही प्रवेश बंदी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेतही घातली होती काळ्या कपड्यांवर बंदी

जेव्हा मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचे उद्घाटन झाले होते, तेव्हा त्या ठिकाणी त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना व्हीआयपी पास देण्यात आले होते. संबंधित पास असणाऱ्या नागरिकांनाच सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता. पण, त्यावेळीसुद्धा काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या नागरिकांवर प्रवेशबंदी घालण्यात आली होती. काटेकोर तपासणी केल्यानंतरच त्यांना सभास्थळी प्रवेश देण्यात येत होता.

इतकेच नाही तर यापूर्वी पुण्यातील एमआयटी जेव्हा नरेंद्र मोदींची सभा झाली होती. त्यावेळीही काळे कपडे परिधान करून येणाऱ्या नागरिकांना सभास्थळी प्रवेश नाकारला जात होता. तेव्हा शर्ट, बनियान, टोपी, मोजे, पाकिटं नागरिकांना बाहेर काढून ठेवावे लागत होते.

हे ही वाचा:

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान; काँग्रेस कमिटीच्या सचिवांची माहिती

शिंदे गटाला जे जे हवं ते सगळं कसं मिळतं? : अनिल देसाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss