spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MNS : ‘तुम्हालाच सत्तेत नेणार पण, मी स्वत: बसणार नाही’ ठाकरेंची मनसैनिकांना ‘भिष्म’ प्रतिज्ञा

महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडून सत्ताबदलाचा विकास होत असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्ष आपापली कुळ निश्चित करण्यात आणि संघटना घट्ट करण्यात व्यस्त आहे. तर या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांशी जवळचे संबंध होते. राज ठाकरे यांच्या एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या भेटीनंतर महापालिका निवडणुका लढवणार की नाही, अशी चर्चा होती.

आता राज ठाकरेंनी या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. बीएमसी आणि इतर महापालिकांच्या निवडणुका मनसे एकट्याने लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी युतीबाबत जाहीर केले आहे. कोणत्याही पक्षाशी युती होणार नाही. पक्षाच्या या निर्णयाची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर, राज ठाकरेंनी मनसैनिकांसमोर बोलताना भिष्म प्रतिज्ञा केली आहे. ‘मला पूर्ण विश्वास आहे, आपण सत्तेत पोहचू. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार. मी स्वत: बसणार नाही, अशी राज गर्जना राज यांनी केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी घोषणा केली आहे.

राज्यातील राजकारण खालच्या थराला जात आहे. जे पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये, असेही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळतेय हा भ्रम असल्यचेही राज ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा आणि कामाल लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाने सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर कोणत्याही मीडिया किंवा सोशल मीडियावर बोलू नये, लिहू नये, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या सगळ्यावर मी योग्यवेळी पक्षाची भूमिका मांडणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भूमिका उंचावल्या आहेत.

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

Latest Posts

Don't Miss