spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदेगटाच्या नव्या चिन्हावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, ढाल भाजपची आणि तलवार…

शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिंदेगटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे.

शिंदेगटाला मिळालेल्या नव्या चिन्हावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नव्या चिन्हावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे. तो आम्हाला मान्य आहे. आम्ही प्राधान्य तळपता सूर्य चिन्हाला दिलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला ते चिन्ह दिलं नाही. आम्हाला ढाल तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर, आता ठाकरे गटातील अंबादास दानवेंनीसुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

“मला वाटते ही ढाल भाजपाची आहे आणि तलवार गद्दारांची आहे. ही ढाल बोथट होत असून तलवारीला महाराष्ट्र नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.

शिंदेगटाच्या चिन्हांबद्दल बोलायचं झालं तर शिंदे गटाकडून आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, ती चिन्हं देण्यास आयोगान नकार दिला. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता. तसेच शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिंदेगटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे.

हे ही वाचा:

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

म्यानात तर एकच तलवार असते मग यांच्याकडे दोन कशा, शिंदे गटाच्या चिन्हावर सुष्मा अंधारेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss