Tuesday, October 1, 2024

Latest Posts

ढाल तलवार चिन्हाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामुलाखतीसाठी एकत्र, विविध विषयांवर केलं मत व्यक्त…

या पुरस्कार सोहळ्याच्यावेळी नाना पाटेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलखत घेतली आहे. 

शिंदेगटाने तळपता सुर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह निवडणुक आयोगाला दिल्यानंतर शिंदेगटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. ही निशाणी मिळाल्यानंतर लोकमतने आयोजित केलेल्या लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती दर्शविली आहे. तसेच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर या पुरस्काराच्या विविध क्षेत्रातील मानकऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्यावेळी नाना पाटेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलखत घेतली आहे.

जर राजकारण्यांनी आपला शब्द पाळला नाही तर मतदान दिल्यावर ५ वर्षांनी काय करायचं ते आम्ही करू पण त्याआधी आम्ही (सामान्य जनतेने) काय करायचं?असे विचारले असता तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं ते मतदारांचा आदर राखण्यासाठी केलं. खरंतर हे २०१९ मध्येच व्हायला हवं होतं. भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी मत दिली पण त्यांना हवं तसं काम झालं नाही म्हणून ३ महिन्यांपूर्वी आम्ही मतदारांचा मान राखण्यासाठी पाऊल उचललं, अस एकनाथ शिंदे म्हणाले.

हा बदल व्हायला अडीच वर्ष का लागली? असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, कारण त्यावेळी कोरोना होता आणि तरीही त्या काळात आमचे प्रयत्न सुरू होते. पण आम्हाला यश आलं नाही आणि त्या काळात असं केलं असतं तर आमच्यावरच आरोप झाले असते की असं का करताय म्हणून. कोरोना काळात फेसबूकवर सरकार बनवता येत नाही त्यामुळे आम्ही कोरोनानंतर आम्ही भेटलो आणि फिझिकल सरकार तयार केलं, अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विदर्भातील शेतकऱ्यां वारंवार होणाऱ्या आत्महत्या आणि सुपीक जागांवर उभारल्या जाणाऱ्या एमआयडीसींबद्दल देखील नाना पाटेकरांनी प्रश्न उपस्थित केला. सरकार स्थापन झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत म्हणून ११ हजार कोटींच्या योजनांना मंजुरी दिली आहे. जवळपास २ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आहे आणि समुद्रामधून वाया जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यासाठी आम्ही उपक्रम हाती घेतले आहेत.शेतीसह शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांसाठी विशेष कृती आराखडा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. उत्तर महाराष्ट्र, कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. तर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण प्रत्येक जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार ही योजना त्यांनी सुरू केली होती. मात्र गेल्या अडीच वर्षात ती बंद करण्यात आली. पण, पुन्हा सत्तेत येताच आम्ही ती पुन्हा सुरू केली. तुम्ही पाहिलं तर आमचं सरकार असं सरकार आहे ज्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जर नीट पाहिलं तर जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही आणि जिथे सिंचन नाही तिथे आत्महत्या होतायत. त्यामुळे या आत्महत्या कमी व्हाव्यात म्हणून या दुष्काळी पट्ट्यात आम्ही पहिल्यांदा जलयुक्त शिवार ही योजना राबवली व त्यामुळे जवळपास २७ टिएमसी पाणी या पट्ट्यात थांबलं आणि आपलं रब्बीचं क्षेत्र ४७ टक्क्याने वाढलं. आमचा संकल्प आहे की, जर हे वाया जाणार पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यात जमा करू शकलो किंवा विदर्भातील वाया जाणारे पाणी जर आपण बुलढाण्यापर्यंत आणु शकलो तर आपला संपूर्ण दुष्काळी पट्टा ओलिताखाली येईल. तसेच आपण शेतकऱ्यांसाठी सोलर वीज पुरवण्याचा २ वर्षांचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यात ४००० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाचे १२ तास वीज मिळू शकणार आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या जागेवर हा उपक्रम उभा राहील त्याला आम्ही ४० ते ५० हजार भाडं देणार आहोत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील.

नाना पाटेकरांनी सामान्य जनतेला झेपत नाही म्हणून त्यांच्यावतीने एक प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमची नेमणूक करतो. तुम्ही जनतेचे सेवक आहात, राज्यकर्ते नाही, यावर तुम्ही काय म्हणाल अस विचारलं असता, आम्ही जनतेचे सेवकाच आहोत आणि त्यांचे सेवक म्हणूनच काम करतोय, एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आम्ही लोकांमध्ये जाऊन काम केलेलं काही लोकांना आवडत नाही त्याच काय करावं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला देखील लगावला आहे.

जनतेला भ्रष्ट वाटत असलेल्या नेत्यांचे किंवा राजकारण्यांची चौकशी का केली जात नाही. सामान्य जनतेला दरवेळी मोठमोठ्या चौकशांना सामोरं जावं लागतं पण राजकारण्यांना का नाही?, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले भ्रष्टाचार ही फक्त राजकारणालाच नाही पूर्ण अर्थव्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत. याच कारण असं की, ज्याच्यावर गुन्हे आहेत, जो भ्रष्टाचाराच्या केसमध्ये आता गेलाय. तोच बहुमताने निवडून येतो. त्यामुळे समाजात भ्रष्टाचाराबद्दल तिरस्कार निर्माण होत नाही. त्यामुळे हाच तिरस्कार समाजात भ्रष्टाचाराबद्दल निर्माण होणं गरजेचं आहे. मला वाटतंय मोदीजी आल्यापासून हे भ्रष्टाचार दूर करण्याचं काम सुरू झालंय. ही किड लागलीय पण, कीटकनाशक हळू हळू तयार होतंय आणि हे कीटकनाशक कीड नक्की नष्ट करेल.

लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आला पाहिजे. पण लोकसंख्या नियंत्रण भारतीय पद्धतीने व्ह्यायला हवे, चीनच्या पद्धतीने नाही कारणं मग, चीनमध्ये जी परिस्थिती आहे ती भारतात उद्भवू शकते. त्यामुळे केले जाणारे कायदे हे भारताची लोकसंख्या रचना लक्षात घेऊन केली पाहिजे.

समान नागरी कायदा भारतात असला पाहिजे का? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हो हा असला पाहिजे आणि संविधानाचे हा कायदा राज्यात लागू करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर दिली आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे हा कायदा अस्तित्वात आहे. पण समाजात या कायद्याबद्दल लोक अनेक गैरसमज पसरवतायत.

तसेच रस्त्यांच्या मुद्द्यांवर ते म्हणाले,की मुंबईत २ वर्षात खड्डेमुक्त रस्ते दिसतील आणि ४५० किमी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या बंडवर एकनाथ शिंदे म्हणाले, की ३ महिन्यांपूर्वी आम्ही हा इतिहास घडवला आणि असंघाशी संघ झाल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता. तसेच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर यावेळी निशाणा साधला. तसेच धनुष्य या चिन्हाबद्दल विचारले असता,५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत. बहुमत आमच्याकडे आहेत त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळायला हवे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

‘तळपता सुर्य’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदेगटाला का नाकारलं? कारण आलं समोर…

शिंदेगटाच्या नव्या चिन्हावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, ढाल भाजपची आणि तलवार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss