spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी, जाणून घ्या तुरटीचे फायदे

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. आणि कदाचित तुम्हाला हे माहित नसेल. तसेच आरोग्यासाठी देखील तुरटीचे खूप फायदे आहे. तुरटीचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स ज्या भागी आहेत त्या भागी तुम्ही तुरटी लावू शकता. त्रुटींचा वापर केल्याने तुमचे त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. आणि तुरटीमुळे तुमची त्वचा कोमल आणि सुंदर होईल. जाणून घेऊया तुरटीचे त्वचेसाठी फायदे.

हे ही वाचा : लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर आणि आजारांवर ‘हा’ रामबाण उपाय

 

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर देखील करू शकता. तुरटीमुळे तुमची त्वचा सुंदर आणि मऊ होते. तुरटी बारीक वाटून घ्या आणि पाण्यात मिक्सकरून घ्या. आणि त्या तुरटीचा पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करा. या पाण्याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील पिंपल्स कमी होऊ शकते. तुरटीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. जे त्वचेचे समस्या कमी करण्यास मदत करते.

 

त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही एक चमचा मुलतानी माती घेणे आणि त्यात अर्धा चमचा तुरटीची पावडर, गुलाब पाणी , दूध मिक्स करून घेणे आणि फेसपॅक बनून घेणे. आणि हा तुरटीचा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवा. आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धून घ्या. त्यानंतर कपड्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. आणि मग टोनर आणि मॉइश्चरायजर चेहऱ्यावर लावा. त्यामुळे तुमचा चेहरा मऊ आणि सुंदर होतो.

तुरटीचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावरील डाग देखील दूर करू शकता. एका वाटीत तुरटीची पावडर घेणे. आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून पेस्ट बनवून घेणे. पेस्ट चेहऱ्यावर डाग असलेल्या ठिकाणी लावून मसाज करून घेणे. त्यामुळे त्वचेचा समस्या कमी होतात.

हे ही वाचा :

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणूक होते?, ग्राहकांनी अशी घ्या काळजी

 

 

Latest Posts

Don't Miss