spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MNS : बीड दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचे मोठं वक्तव्य म्हणाले, मला खोटं बोलणारे कार्यकर्ते…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यातील शुक्रवारी (7 ऑक्टोबर) तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. सध्या बीड दौऱ्यावर असलेलं अमित ठाकरेंनी मोठं वक्तव्य आहे. ते म्हणाले, “मला गर्दी करणारे आणि खोटं बोलणारे कार्यकर्ते नको,” असे त्यांनी म्हटले आहे.

“मी दौरा काढल्यापासून अनेक नवनवीन विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. ते मला भेटत आहेत. परंतु गर्दी करणारे आणि खोट बोलणारे कार्यकर्ते मला नको. त्यामुळे मी अनेकांच्या भेटी घेत आहे आणि पक्ष वाढीसाठी नवीन तरुणांना देखील संधी दिली जात आहे, असं म्हणाले. ते बीडमध्ये (Beed) बोलत होते.

हेही वाचा : 

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मराठवाडा दौऱ्यात अमित ठाकरे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात पोहोचले आहेत. अमित ठाकरे काल संध्याकाळी परळीमध्ये पोहोचले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं. तर आज कंकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते बैठकीत सहभागी होतील आणि त्यानंतर नारायण गड आणि भगवानगडावर जाऊन देखील ते दर्शन घेणार आहेत.

याआधी ११ ऑक्टोबर रोजी त्यांनी परभणीतील फर्न हॉटेलच्या सभागृहात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. “मुंबईत राहून तुमचे प्रश्न कळणार नाहीत. त्यामुळेच मी इथे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आलो आहे. पुढच्या काळात एक मोठी युवा शक्ती आपल्याला उभी करायची असून त्यासाठी सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसोबत यावे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी यावेळी केलं.

Shivsena Uddhav Balasaheb thackeray : ‘कोणत्याही दबावाला ऋतुजा लटके बळी पडणार नाही’ ; अनिल परब

दसरा मेळावा विषयावर बोलणे टाळले

मराठावाडा दौऱ्यापूर्वी सोलापुरात आले असता अमित ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा, तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला, यावर अमित ठाकरेंना प्रश्न विचारला असता मेळावे झालेत का, मी पाहिले नाही, असे म्हणून राजकीय विषयावर बोलणे टाळले.

ADNL : गौतम अदानी एअरटेल-जिओला टक्कर देण्यासाठी तयार, ADNL 5G सेवेच्या स्पर्धेत उतरणार

Latest Posts

Don't Miss