Tuesday, October 1, 2024

Latest Posts

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाचे दावेदार मुरजी पटेल यांची माघार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून एकापाठोपाठ एक ट्विस्टची मालिका हि सुरुच आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अजूनही मंजूर न झाल्याने ठाकरे गटासमोरील पेच वाढला आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून एकापाठोपाठ एक ट्विस्टची मालिका हि सुरुच आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अजूनही मंजूर न झाल्याने ठाकरे गटासमोरील पेच वाढला आहे. तसेच आता ही निवडणूक शिंदे गट (Shinde Group) लढवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून मुरजी पटेल हे या निवडणुकीसाठी तयारी करत होते. आता शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे ऋतुजा लटके यांना देखील आपल्याकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकापाठोपाठ एक घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख १४ ऑक्टोबर आहे. त्याआधी शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पहिला संघर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही ठाकरे आणि शिंदे गटातच लढली जाईल. निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपने दाखवलेला दावा सोडल्यात जमा आहे. त्यामुळे भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.

मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल हे भाजपचे दावेदार उमेदवार समजले जात होते. परंतु आता त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे

हे ही वाचा :

मी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार; ऋतूजा लटके यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

MNS : बीड दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचे मोठं वक्तव्य म्हणाले, मला खोटं बोलणारे कार्यकर्ते…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss