Tuesday, September 24, 2024

Latest Posts

आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा; सगळ्या प्रकाराची कुजबूज आमच्यापर्यंतही…

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षामध्ये मोठा बंड झालं त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षात उभी फूट पडली. शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्याने त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संघर्ष झाला आणि अखेर निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवून टाकलं. तसंच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घातली. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नवं पक्षचिन्ह आणि पक्षनावही देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कुणकुण ठाकरे कुटुंबाला आधीच लागली असती तर शिवसेनेतील हा गदारोळ टाळता आला असता का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका मराठी वेबसाइटशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘आमच्या घरामध्ये याबाबत साधारण एक ते दीड वर्षांपूर्वीच चर्चा झाली होती. या सगळ्या प्रकाराची कुजबूज आमच्यापर्यंतही पोहोचली होती. मागच्या वर्षी मी जेव्हा दावोस दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा २० मे रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घरी मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं आणि तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का, असं थेट विचारलं होतं. तसंच नक्की काय गडबड सुरू आहे, असंही उद्धव ठाकरेंकडून शिंदे यांना विचारण्यात आलं होतं,’ असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

अनेक लोकांकडून आम्हाला त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. मात्र ती लोकं आम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, असा विचार करून आम्ही दुर्लक्ष केलं,’आम्ही जेव्हा एखाद्यासोबत काम करतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्यांनी बंडखोरी केली आहे त्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारची मदत केली आहे. त्यातील अनेक जण तर शपथ घेऊन आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असं सांगत होते, मात्र त्यांनी गद्दारी केली, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

Keral: केरळमधील नरबळी घटनेशी संबंधित धक्कादायक गोष्ट आली समोर, संशयित नरभक्षक असल्याचा पोलिसांचा संशय

T20 World Cup : विराट कोहली आणि इतर खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये चिल करताना, केला सुंदर फोटो शेअर

३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल; ऋतुजा लटके यांच्या अर्जावर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss