spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चीनमधल्या १,३०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना दोन वर्षां नंतर व्हिसा मंजूर

कोरोना महासाथीच्या (Coronavirus) दोन वर्षानंतर चीनमध्ये (China) शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १,३०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिसा मिळवला आहे, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. चीनच्या परराष्ट्र खात्याने भारतीय दूतावासाला दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना महासाथीची लाट सुरू झाल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही देशातील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. नुकतेच, ३०० भारतीय व्यावसायिक चीनमधील फॅक्टरी हब असलेल्या यिवूमध्ये दोन चार्टर विमानाने दाखल झाले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे आशियाई विभागाचे संचालक लिऊ जिन्साँग यांनी भारतीय राजदूत प्रदीप रावत यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती आदी विविध मुद्यांबाबत चर्चा झाली. कोरोना महासाथीनंतर चीनने ऑगस्ट महिन्यात कोरोना निर्बंध शिथील केले. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आयसोलेशनच्या कालावधीत ही कपात करण्यात आली. आता सात दिवस हॉटेलमधील आयसोलेशन आणि घरी तीन दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. जूनमध्ये हा कालावधी १४ आणि सात दिवसांचा होता.

चिनी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे हजारो भारतीय विद्यार्थी सध्या घरातच अडकले आहेत. २३,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या विविध चिनी विद्यापीठांमध्ये नोंदणीकृत आहेत, त्यापैकी बहुसंख्य वैद्यकीय विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना परत येण्याची परवानगी द्यावी यासाठी भारत अनेक दिवसांपासून चीनला आग्रह करत आहे. जुलैमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या चीनमध्ये परत येण्याची प्रक्रिया जलद करण्याच्या गरजेवर भर दिला होता. चीनमध्ये अद्यापही थेट उड्डाणे सुरू झाले नाहीत. चीनमध्ये दाखल झालेले भारतीय विद्यार्थी हे हाँगकाँग मार्गे दाखल झाले आहेत. हाँगकाँग मार्गे दाखल होणाऱ्यांसाठी तीन दिवसांचे सेल्फ मॉनिटरिंग आवश्यक आहे. तर, क्वारंटाइन सक्तीचे नाही. मात्र, अद्यापही विमान प्रवासाचे तिकीट दर अधिक आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनानंतर कोरोना निर्बंध शिथिल होतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, निर्बंध शिथिल झाले नाहीत. मात्र, चीनमधील काही भागांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीए.५.१.७ आढळल्याने निर्बंध पूर्णपणे शिथिल होणार नसल्याचे म्हटले जात आहे.

 

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा; सगळ्या प्रकाराची कुजबूज आमच्यापर्यंतही…

T20 World Cup : विराट कोहली आणि इतर खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये चिल करताना, केला सुंदर फोटो शेअर

३० दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल; ऋतुजा लटके यांच्या अर्जावर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss