spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पिझ्झा बनवण्याची नवीन पद्धत… घ्या जाणून

तुम्ही रोज पोळी भाजी खाऊन कंटाळत असाल तर एक नवीन पद्धतीने बनवा पिझ्झा आणि पिझ्झा खाण्याचा आनंद देखील घ्या. रोज नवीन पदार्थ खायाला आवडतात. त्यावरून चटपटी पदार्थ खायाला अजूनच आवडतात. आपण वेगवेगळया पद्धतीचा पिझ्झा खातो. तेच तेच पिझ्झा खायाला आवडत नाही. आणि त्या पदार्थपासून तुम्ही कंटाळत देखील असाल. पिझ्झा हा झटपट होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही टिफिन साठी देखील बनवून घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल. चला मग नवीन पद्धतीचा पिझ्झा कसा बनवायचा घरच्या घरी ते जाणून घ्या

हे ही वाचा : कशी तयार करायची केळीची कचोरी ? जाणून घ्या रेसिपी…

 

साहित्य –

ब्रेड – ५ ते ६ स्लाईस
बटर – २ चमचे
लसूण – १ चमचा बारीक केलेला
वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची – ३ ते ४
कांदा – १
मिक्स्ड हर्ब – १ चमचा
टोमॅटो केचअप – २ चमचे
मोझोरोला चीज – ३ ते ४ चमचे

 

कृती –

ब्रेडचे स्लाइज मिक्सकरमध्ये वाटून बारीक करून घ्या.

त्यानंतर पॅनमध्ये बटर घालून घ्या. त्यामध्ये थोडा लसूण घालून चांगला लालसर करून घ्या. लसूण चांगला लालसर झाला की त्यामध्ये ब्रेडचा चुरा घालून तो देखील चांगला कुरकुरीत परतून घ्या.

वेगवेगळ्या रंगाचे शिमला मिरची कापून घ्या आणि बारीक कांदा कापून घ्या.

त्यामध्ये मिक्स हर्बस आणि टोमॅटो सॉस घालून ते एकजीव करून घ्या.

एक ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये बारीक कुरकुरीत झालेला ब्रेडचा चुरा घालून घेणे. त्यानंतर त्यामध्ये भाजीचे टॉपिंग घालून त्यावर भरपूर मोझोरोला चीज घाला. असे लेअर २ वेळा लावून घ्या.

आणि हा कप ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी ठेवा. आणि कप ओव्हनमधून गरमझाल्यानंतर बाहेर काढून घेणे आणि पिझ्झा खाण्याचा आनंद घेणे.

हे ही वाचा :

नाश्त्यासाठी बनवा कोबीची वडी, जाणून घ्या रेसिपी…

 

Latest Posts

Don't Miss