Tuesday, October 1, 2024

Latest Posts

सीपीआयचे नेते मातोश्रीवर; ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरोधी लढाईत सोबत !

ज्या लालबाग परळमध्ये लाल बावट्याचा जोर कमी करण्यासाठी शिवसेनेने शर्थीचे प्रयत्न केले, प्रसंगी रक्ताचा सडा पडला, ही लढाई अगदी खूनापर्यंत गेली, त्याच कम्युनिस्ट पार्टीने आता संघर्षातून नव्याने उभ्या राहत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत लढू. भाजपविरोधातील लढाईतही तुमच्या साथीला असू, असा विश्वास कम्युनिस्ट नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. आज दुपारच्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपविरोधातील निवडणुकीला पाठिंबा दर्शवला. भाकपच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत यांचा समावेश होता. तर, शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर आदी उपस्थित होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ताकद अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मर्यादित असली तरी दोन टोकाच्या विचारधारा एकत्र येणं, कम्युनिस्टांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देणे ही राजकारणातली मोठी घडामोड आहे. शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून सेनेचा कम्युनिस्टांसोबत अतिशय तीव्र संघर्ष राहिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये अक्षरश: हाडवैर होते. या संघर्षातूनच कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची मुंबईत १९७० मध्ये झाली. गिरणी कामगारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा होती. बाळासाहेब ठाकरे तर कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख लाल माकडं असं करीत असंत. पण मधल्या काळात बदललेलं राजकारण, उद्धव ठाकरेंची भूमिका, आणि भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी म्हणून हे हाडवैरी एकत्र आल्याचं चित्र आहे.

हे ही वाचा:

महागाई दर वाढत असताना IMF ने का म्हटले – भारत ही इतर जगाच्या तुलनेत मजबूत अर्थव्यवस्था आहे?

शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss