अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके, यांच्या उमेदवारीचं भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.. मुंबई महापालिकेनं ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर न केल्यानं, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. आणि आजच त्यावर निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम दिवस आहे. दरम्यान लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याच्या प्रक्रियेत कुणाचाही दबाव नसल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलंय. दबावापोटी लटकेंचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. या प्रकारामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान यासर्व वादात मनसे नेत्याने खळबळजनक ट्विट केले आहे.
नेमकं काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच…..असं सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.
मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच…..@News18lokmat @TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @zee24taasnews
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 12, 2022
हेही वाचा :
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीबाबत सर्वोच्च न्यायालय आज निकाल
ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठीच अनिल परब यांचा हा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा सगळा डाव एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं अनिल परब म्हणत होते. मात्र, मनोज चव्हाण यांनी आता यात ठाकरे गटाचाच हात असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, लटके कुटुंबीयांनी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही. दोघांचातील चर्चा गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांच्या उपस्थित विलेपार्ल्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमोद सावंत आणि कमलेश राय हेदेखील उपस्थित होते. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मोठा फेरबदल, २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घ्या कुणाची बदली कुठे?