spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात जास्त साजरा केला जाणारा सण आहे. वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा हा उत्सव मानला जातो. रावणाचा पराभव करून आपली पत्नी सीतेसह अयोध्येला परतल्यानंतर भगवान रामाचे घरवापसी हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या १५ दिवस आधीच लोक त्यांच्या घरांची साफसफाई करण्यास सुरवात करतात जेणेकरून हा सण साजरा करताना नवीन सुरुवात करू, ह्या धैयाने प्रत्येकजण आपापल्या घरात दिवे, पणत्या आणि फटाके पेटवून उत्सव साजरा करत असतात. त्यात अलीकडच्या काळात दिवाळी म्हटलं तर, भेटवस्तू,सेल,ऑफर अनेक गोष्टीची उत्सुकता असते. तर Flipkart घेऊन आला आहे दिवाळीची धमाकेदार ऑफर… जाणून घ्या सविस्तर माहिती.

हेही वाचा : 

Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी iPhones वर जबरदस्त सेल आणला आहे. १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत तुम्ही या सेलचा आनंद घेऊ शकता. यामध्ये अनेक उत्पादनांवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. फ्लिपकार्टच्या अधिकृत साइटवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट दिली जाते. iPhones वर किती सूट मिळतात ते पहा.

iPhones च्या या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट

आम्ही तुम्हाला सांगतो की Flipkart ने जारी केलेल्या शेवटच्या सेलमध्ये iPhones वर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती. अशा परिस्थितीत, जर तुम्ही शेवटच्या सेलमध्ये सवलतीचा लाभ घेऊ शकला नाही, तर तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Flipkart Diwali Sale मध्ये तुम्ही iPhone १३ स्वस्तात म्हणजेच ६० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्ही Flipkart वरून ५९,९९९ रुपयांमध्ये iPhone १३ खरेदी करू शकता. तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता म्हणजेच बँक ऑफरसह. याशिवाय तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Mili Teaser: जाह्नवी कपूरच्या ‘मिली’चा टीझर पाहिलात?

पहा, दिवाळी सेलमध्ये डिस्काउंट

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Apple A१५ Bionic चिपसेट वापरला आहे. तुम्हाला हाच चिपसेट iPhone १४ मध्ये देखील मिळेल. याशिवाय तुम्ही iPhone १२ Mini वर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये ३३,७४० रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही Apple iPhone ११ स्वस्तात खरेदी करू शकता. हे ई-कॉमर्स साइटवर ३५,९९० रुपयांमध्ये सूचीबद्ध केले गेले आहे, जे बँक ऑफर किंवा एक्सचेंज ऑफरसह स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते.

MNS : मनसे नेत्याचे ऋतुजा लटकेंसाठी एक ट्विट चर्चेत म्हणाले, वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच…

Latest Posts

Don't Miss