spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही; शंभूराज देसाई

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला होता. आता दोन्ही गटाकडून खरी शिवसेना कोणती यामध्ये वाद सुरु आहे. रोज सत्ताधारी आणि विरोधकांन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने स्वीकारला नसल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गुरुवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आणि शिंदे गटावर होत असलेले आरोप फेटाळून लावले.

‘निवडणुकीची दिशा बदलण्याचं काम काही लोक करत आहेत. आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही. त्यांच्या बाजूने निर्णय आला की सगळ्या यंत्रणा योग्य आणि विरोधात निर्णय गेला की यंत्रणा आणि आमच्यावर आरोप; हे चुकीचं आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. घटनेने दिलेल्या अधिकारात आयोग काम करतो, अशा भावना शंभूराज देसाई यांनी यांनी व्यक्त केल्या. शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. याच कारणामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

लटके कुटुंबीयांनी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही. दोघांचातील चर्चा गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांच्या उपस्थित विलेपार्ल्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमोद सावंत आणि कमलेश राय हेदेखील उपस्थित होते. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा :

Karwa Chauth 2022 : चित्रपटांमुळे आले ‘करवा चौथ’ व्रताला ग्लॅमर रूप… ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’

Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss