spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंची उमेदवारी पक्की. उद्या सकाळपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याचे पत्र मुंबई महानगरपालिका ऋतुजा लटके यांना देणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या परिस्थितीत आम्हाला हस्तक्षेप करणं भाग आहे. उद्या सकाळी ११ पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या, असं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

हे ही वाचा :

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

मोठी बातमी! ऋतुजा रमेश लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss