Wednesday, October 2, 2024

Latest Posts

ऋतुजा लटके यांच्या बाजूने लागल्यालानंतर ठाकरे गटातील महिलांच्या प्रतिक्रिया; आम्ही थेट भिडणारे लोक…

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी पर्टिक्रिया दिली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, भारतीय संविधानाची एक चौकट आहे, एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करायचा नसतो. परंतु मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका आपलं हसं करुन घेत आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना मैदान मिळू नये, यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यांना एवढी राजकारणाची आवड असेल तर त्यांनी राजकीय पक्षात येऊन राजकारण करावं, असा टोला अंधारेंनी लगावला. ”शिवसेनेचा प्लॅन बी नसतो. आम्ही थेट भिडणारे लोक आहोत. त्यामुळे उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज आम्ही धुमधडाक्यात भरु” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी त्यांनी सांगितलं की पालिकेच्या तोंडात सणसणीत बसली आहे. ही दिरंगाई चालू होती ती कोणाच्या दबाव खाली सुरु होती, जी महाशक्ती महाराष्ट्रावर राज्य करत आहे तिचा कुठे यामध्ये हात होता का हे शोधून काढणं गरजेचं आहे. अशी घणाघाती टीका मनीषा कायंदे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये घोळ घातला त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जिकडे जिकडे आम्हाला अडथळे निर्माण करतील तिकडे तिकडे आम्ही कोर्टाची पायरी चडू तिकडे आम्ही न्याय देवतेचे दरवाजे ठोकवू आणि आम्ही लढतच राहू असं मनीषा कायंदे यांनी सांगितलं आहे.

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर आणि उपनेते किशोरी पेढणेकर यांनी सुद्धा महापालिकेचा विरोध केला आहे. पालिका कोणाच्या तरी दबाव खाली काम करत आहे ते सर्वांच समजला आहे. लटके ताईंच्या अर्जावर पालिकेने राजकरण केलं आहे असा आरोप किशोरी पेढणेकर यांनी केला.

हे ही वाचा :

Andheri East By Poll Election : ऋतुजा लटकेंच्या मुलाची मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या लष्करी कुत्र्याने ‘झूमने’ घेतला जगाचा निरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss