Wednesday, October 2, 2024

Latest Posts

हाता पायांना का मुंग्या येतात?, जाणून घ्या कारणे

मुंग्या येण्याची कारणे बरेच असू शकतात. हाता पायांना मुंग्या येणे हे आजराचे लक्षण देखील असू शकते. यावर वेळीच उपचार केले पाहिजे. काही लोकांना हाता पायांना मुंग्या आल्यास भरपूर त्रास होतो. गंभीर आजरामुळे देखील मुंग्या येतात. बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा मांडी घालून बसल्यानंतर किंवा बराच वेळ हात पाय धरून ठेवल्यानंतर हे जाणवते. याचे कारण असे की बऱ्याच वेळा एका ठिकाणी रक्त थांबते म्हणून हातापायांना मुंग्या येतात. ते जाणून घ्या कारणे.

हे ही वाचा : किडणी खराब होऊ नये म्हणून हे पदार्थ खाणे टाळा

 

जर तुमच्या हाता पायांना मुंग्या येत असतील, तर तुमच्या मध्ये व्हिटॅमिन ची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन ची कमतरता असल्यामुळे तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे हाता पायांना मुंग्या येतात .

खूप वेळ टायपिंग केल्याने हातांना मुंग्या येतात.

जे अचानक मध्ये मान लचकली तर तुम्हाला पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येऊ शकतात. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा मान लचकते. किंवा मानेला काय दुखापत झाल्यास मान लचकली जाऊ शकते.

 

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास हाता पायांना सूज येते आणि मुंग्या येतात.

शरीरातील रक्तभिसरण नीट होत नसल्यास नसांवर दाब येतो आणि त्यामुळे शिरा वाढणे , रक्ताच्या गाठी , किंवा शरीरात कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, ची कमतरता असल्यामुळे देखील हाता पायांना मुंग्या येतात.

सिगरेट आणि दारूच्या अति व्यसनामुळे नसांवर दाब येतो. आणि त्यामुळे देखील हाता पायांना मुंग्या येतात.

गरोदरपणात स्त्रियांना हाता पायांना मुंग्या येऊ शकतात.

शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे हाता पायांना मुंग्या येऊ शकतात.

ज्या लोकांना थायरॉईड चा त्रास आहे त्यांना देखील हाता पायांना मुंग्या येतात.

हे ही वाचा :

सर्दी खोकला असू शकते ‘या’आजाराचे लक्षण, काळजी घ्या

 

Latest Posts

Don't Miss