Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Andheri By Poll Election : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया…

ऋतुजा लटके यांना आज उच्च न्यायालयाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर विभागप्रमुख आणि नेते अनिल परब आणि ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रमेश लटके यांच्या अकाली मृत्यूनंतर आम्ही त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. हे अत्यंत साधं प्रकरण होतं, मात्र ऋतुज लटके यांनी निवडणूक लढवू नये यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले. पण न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि आज आमच्या बाजूने निकाल लागला आहे. आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो असा अनिल परब यांनी सांगितलं.

जो युक्तिवाद काल पर्यंत नव्हता तो अचानक दीड वाजता आणला आणि ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टचाराचा आरोप केला. पण सन्मानीय न्यायालयाने तो आरोप फेटाळून लावला. आणि ऋतुजा रमेश लटके याना उमदेवार अर्ज भरण्याची मोकळीक करून दिली आहे. आम्हाला सध्या प्रत्येक लढाई न्यायालयात घेऊन जावी लागते. राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलं आहे. असा आरोप त्यांनी या वेळी केला आहे.

तर ऋतूजा लटके यांनी सांगितलं कि आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आपण सर्वजण एकत्र लढू मी तुमच्या पाठीशी आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा :

हिंगोलीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीकविमा कंपनीविरोधात शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर आक्रमक

Chhagan Bhujbal : स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss