spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Andheri East Bypoll 2022 : मुरजी पटेल हे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंशी लढत

अखेर निर्णय समोर आला. मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार असतील. शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ उमेदवार देणार नाही. शिंदे गट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे, ऋतुजा शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) फॉर्म भरणार आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. म्हणजेच ही निवडणूक शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. आज शुक्रवारीच मुरजी पटेल हेही भाजपचे उमेदवार म्हणून फॉर्म भरणार आहेत.

हेही वाचा : 

रात्रभर एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे सोडलंच नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. त्यांचा उमेदवारही ठरला होता. मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता. शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता. त्यानंतर आज ही जागा भाजपच लढवेल यावर एकमत झालं. त्यामुळे मुरजी पटेल आज आपल्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लट्टे या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके यांनी शिवसेनेच्या मुरजी पटेल यांचा ४५ हजार मतांनी पराभव केला. मात्र त्यानंतर मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तरीही एवढी मते मिळवण्यात त्यांना यश आले.

जाणून घ्या ओट्स खाण्याचे फायदे…

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाकडून ऋतुजा लटके यांचं नाव अंतिम झालं असून त्या आपला उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहेत. त्यांनी महापालिकेतील सेवेचा राजीनामा दिला होता. पण महापालिका प्रशासनाने त्यांचा हा राजीनामा स्वीकारला नव्हता. महापालिका प्रशासनाच्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ऋतुजा लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महापालिकेला आज सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारायला सांगितला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात सध्या तरी ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना टळलाय.

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे या समस्या होतील

Latest Posts

Don't Miss