spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rutuja Latke : अखेर BMC ने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून झालेल्या गदारोळात मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला मोठा दणका दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी (१३ ऑक्टोबर) उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी १०:३० वाजेपर्यंत स्वीकारावा आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर निवडणूक होत आहे. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लट्टे यांच्या पत्नी आहेत. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर, आज म्हणजेच १४ उमेदवारीचा अर्ज त्या भरणार आहेत.

ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया

कोर्टाच्या निर्णयानंतर, मला न्यायदेवतकडून न्याय मिळाला आहे. आपण पतीचा वारसा पुढे नेणार आहोत. राजीनामा मंजूर झाल्याची प्रत मिळाल्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ऋतुजा लटके यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

हेही वाचा : 

मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हणणाऱ्या आपच्या नेत्यावर स्मृती इराणी संतापल्या म्हणाल्या, ‘हे तोंडाचं गटार…’

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. त्यांचा उमेदवारही ठरला होता. मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता. शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता.

ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२० रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते.

मशाल विरुद्ध कमल

अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडू दावा केला जात होता. त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल संदिग्धता होती. मात्र आज संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.

Maharashtra Monsoon : राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी, उद्यापासून उघडीपीची शक्यता

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. त्यांचा उमेदवारही ठरला होता. मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता. शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता.

Andheri East Bypoll 2022 : मुरजी पटेल हे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंशी लढत

Latest Posts

Don't Miss