spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Code Name Tiranga : १०० रुपयांत पहा, परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि गायक हार्डी संधू यांचा चित्रपट ‘कोडनेम तिरंगा’ हा आज म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांच्यासोबत शरद केळकर, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हणणाऱ्या आपच्या नेत्यावर स्मृती इराणी संतापल्या म्हणाल्या, ‘हे तोंडाचं गटार…’

‘परिणीती चोप्राने अप्रतिम काम केले आहे. ती अॅक्शन अवतारात दाखवण्यात आली आहे. परिणीतीने इमोशनल सीन्सही उत्तम केले आहेत. यासाठी परिणितीने मेहनत घेतली आहे. इथे नायिका अॅक्शन करते, हे वेगळं. हार्डी संधूने त्याची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. तो तुम्हाला कुठेही पंजाबी गायक किंवा अभिनेत्याचा फील देत नाही, ना लूकमध्ये ना डायलॉग डिलिव्हरीत. शरद केळकर मुख्य खलनायक बनला असून त्याची स्क्रीन प्रेझेन्सही अप्रतिम आहे. रजित कपूरनेही उत्तम काम केले आहे आणि दिव्येंदू भट्टाचार्यनेही उत्तम अभिनय केला आहे. प्रत्येकाचा अभिनय चांगला आहे, पण एवढ्या दमदार कलाकारांना ज्या प्रकारचे संवाद आणि कथा दिली आहे ते अप्रतिम दाखवू शकत नाही.

आता प्रेक्षकांना हा चित्रपट अवघ्या १०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. परिणीती आणि हार्डी संधूच्या या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे तो आता केवळ १०० रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कोडनेम तिरंगा’ या चित्रपटाचे मुख्य कलाकार परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना त्यांचा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये परिणीतीने सांगितले की, त्यांच्या या चित्रपटाच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे, ज्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट केवळ १०० रुपयांमध्ये पाहू शकणार आहेत.

या चित्रपटाची तिकिटे केवळ रिलीजच्या पहिल्या दिवशीच १०० रुपयांना मिळतील, असे देखील त्यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटाच्या तिकिटांमध्ये सवलत दिली गेली होती. तीच ऑफर काही काळासाठी पुन्हा वाढवण्यात आली होती. याच अंतर्गत या चित्रपटाची तिकिटे १०० रुपयांमध्ये विकली जात आहेत.

Election Commission : हिमाचल, गुजरात निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

गेल्या महिन्यात राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या जबरदस्त यशानंतर, जिथे प्रत्येक चित्रपटाची तिकिटे देशभरातील स्क्रीनवर ७५ रुपयांना उपलब्ध होती, अनेक बॉलीवूड चित्रपटांनी त्यांच्या तिकिटांच्या किमती कमी केल्या आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss