spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : जेवण बनवण्यावरून ‘या’ दोघींमध्ये उडाले खटके! पहा नेमकं झालं काय ?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले काही दिवस अमृता धोंगडे सतत वाद आणि भांडणात दिसत आहे. नुकतेच तिचे यशश्री मसुरकर सोबत भांडण झाले.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले काही दिवस अमृता धोंगडे सतत वाद आणि भांडणात दिसत आहे. नुकतेच तिचे यशश्री मसुरकर सोबत भांडण झाले. ते भांडण ताजे असतानाच लगेचच तेजस्विनी लोणारी आणि तिच्यात जोरदार भांडण झालं आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या खास मैत्रिणी म्हणवणाऱ्या तेजस्विनी आणि अमृता अचानक भंडायला का लागल्या, असं काय झालं की क्षणात दोघी एकमेकांच्या विरोधात गेल्या हे आजच्या भागात कळणार आहे.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF म्हणजेच खास मैत्रिणी असलेल्या अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली. याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘ही पध्दत नव्हे’ त्यावर अमृताचा पारा चढला. ” हो हीच पद्धत आहे आता” असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले. तेजस्विनीचे म्हणणे आहे, “अरे रा वीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं.” अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, “सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी.” घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल की अजूनच वाढेल?

बिग बॉस मराठी’चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन ११ दिवस उलटले असून आता घरी मजा येऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र – मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच वादन होताना दिसत आहे. इथे कुणीही आपलं नसतं, या मांजरेकरांच्या वाक्याची प्रचिती येऊ लागली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे. अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, “त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते कि आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत… मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. ही तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 “मी कट्टर आहे” आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन”. आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे बघूया आजच्या भागामध्ये.

हे ही वाचा :

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

Bigg Boss 16 : ‘रविवार का वार’ मध्ये होणार ‘या’ नव्या सेलिब्रिटीची एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss