spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Himachal Pradesh Election 2022 Date : मुंबई, गुजरात नाही केवळ ‘हिमाचल प्रदेश’ची विधानसभा निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची आशा होती.

केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची आशा होती. पण आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली.

हिमाचल प्रदेशमधील राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती व अहवाल मागवण्यात आले होते. त्यावर चर्चा केल्यानंतर मतदानाचे वेळापत्रक आखण्यात येत आहे. उत्सवांच्या तारखा लक्षात घेऊन मतदानाचे दिवस निश्चित करण्यात आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. आजपासून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे तर १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचं सरकार होणार हे स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ५५ लाख ०७ हजार २६१ मतदार आहेत. यामध्ये २७ लाख ८० हजार पुरुष मतदार आहेत. तर २७ हजार २७ महिला मतदार आहेत. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणारे एक लाख २२ हजार मतदार आहेत. त्याशिवाय दिव्यांग मतदारांची संख्या ५६ हजार इतकी आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या एक लाख ८६ हजार इतकी आहे.

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. हिमाचलमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुका चार टप्प्यात झाल्या. निवडणुकीत भाजपने ६८ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा :

G. N. Saibaba : अखेर प्रा. जी. एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता; कोर्ट म्हणाले…

Gyanvapi Masjid Case : वाराणसी कोर्टाने मशिदीतील ‘शिवलिंग’च्या कार्बन डेटिंगला दिला नकार

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss