spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत शॉपिंग करत आहात ? तर तुमच्यासाठी खास टिप्स

दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशमय वातावरण , आणि नाते घट्ट करून नात्यांमध्ये गोडवा आणे याला दिवाळी सण म्हणतात. दिवाळी म्हटली की फटाके ,फराळ ,खरेदी करणे आलेच. पण दिवाळीत खरेदी करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात ऑफर्स वगरे पाहायला मिळतात. तसेच दिवाळीत आपण स्वतःसाठी खरेदी करतो तसेच इतरांसाठी देखील खरेदी करतो. पण इतरांसाठी खरेदी करतो तेव्हा तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील. काय घ्याचे ? कोणती वस्तू द्याची ? वस्तू आवडेल की नाही ? बजेट काय असावा ? असे प्रश्न तुम्हाला नक्की पडत असतील. तर तुम्ही गोंधळून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून काही टिप्स सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही आनंदाने आणि आरामात दिवाळीची शॉपिंग करू शकता.

हे ही वाचा : Diwali 2022 : धनत्रयोदशीला करू नका ‘या’ वस्तूंची खरेदी

 

दिवाळीत शॉपिंग करण्यासाठी काही टिप्स –

सर्व प्रथम तुम्हाला ज्याचा वस्तू साठी घेत आहे. त्यांची आवड निवड माहित असणे गरजेचे आहे.

त्यानंतर तुम्ही तुमचा बजेट ठरवा.

तुम्हाला कोणासाठी काय घ्याचे आहे. यांची यादी तयार करणे. त्यामुळे शॉपिंग करताना तुम्ही गोंधळून जाणार नाही.

यादी म्हटल्यावर लांबलचक तर असणारच. पण यादीतील ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांची शॉर्टलिस्ट करून घेणे.

त्यानंतर खरेदी तुम्ही कुठून करणार आहे ते ठरवा. आणि जिथून खरेदी करणारा आहे तिकडे आपल्या बजेट मध्ये वस्तू मिळतील ना याचा विचार करणे आणि वस्तू घेणे ठरवणे.

 

खरेदी करताना तुम्ही स्ट्रीट शॉपिंगला प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला चांगल्या बजेट मध्ये वस्तू मिळतील.

जर तुम्ही ओनलाईन शॉपिंग करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही दिवाळीत इ – कॉमर्स या साइटला, किंवा फिलपकार्ट , अमॅझॉन या साइट वरून खरेदी करणे. पण दिवाळीत शॉपिंग करताना काळजी घ्या. वस्तूंची फसवणूक होणार नाही. आणि ऑफर्स काही कालावधीसाठीच मर्यादित असतात. हे देखील जाणून घेणे.

त्यानंतर कोणत्या वस्तू स्वस्तात मिळतील कुठे मिळतील हे देखील तुम्ही आधी ठरवले पाहिजे. आणि खरेदी केली पाहिजे. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि पैसे देखील वाचतात.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

 

Latest Posts

Don't Miss