भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी करवा चौथ हा सर्वात शुभ सण मानला जातो. हा कार्तिक महिन्याच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो, सणादरम्यान, विवाहित भारतीय स्त्रिया एक दिवस निर्जला (अन्न/पाणी नाही) उपवास ठेवतात. करवा चौथच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सर्गी, मेहंदी, अशी बरीच तयारी केली जाते. यावर्षी करवा चौथ बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अधिक खास असेल, कारण अनेक सेलिब्रिटी जोडप्यांसाठी करवा चौथ साजरा करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे आता आपण पाहणार आहोत की बॉलीवूड सेलिब्रिटीजनी यावर्षीच करवा चौथ नक्की कशाप्रकारे साजरा केला आहे:
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील हॉटशॉट कपल्सपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाची छायाचित्रे पाहण्यासाठी जसे सर्वजण उत्सुक होते, त्याचप्रमाणे करवा चौथचे फोटो पाहण्यासाठीही सर्वजण उत्सुक होते. पहिला करवा चौथ साजरा करून झाल्यावर कतरिना कैफ आणि विकी कौशलने त्यांच्या सोशल मीडियावर हँडल्सवर फोटोज शेअर केले आहेत.
वरुण आणि नताशाचाही हा पहिला करवा चौथ होता. वरुण आणि नताशाने सुरुवातीपासूनच आपले नाते गोपनीय ठेवले होते. जेव्हा या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. करवा चौथनंतर वरुणने स्वतःचे आणि नताशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अतिशय साध्या पद्धतीने दोघांनीही हा सण साजरा केला.
अभिनेत्री मौनी रॉयचाही हा पहिलाच करवा चौथ होता. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले. मौनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर मेहंदी लावतानाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर करवा चौथ साजरा करतानाचे फोटोजदेखील मौनीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अंकिता आणि विकीचे लग्न जितक्या धूमधडाक्यात पार पडले, तितकाच अप्रतिम त्यांचा करवा चौथ ठरला. अंकिताने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर करवा चौथचे फोटो शेअर केले आहेत.
शिल्पा शेट्टी कुंद्रा दरवर्षी तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर सुंदर फोटो शेअर करत असते. यावेळीही तिने लाल साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर तिने आणि महीप कपूर, नीलम सोनी, भावना पांडे, सुनीता कपूर इत्यादी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींनी एकत्र करून करवा चौथचा सण साजरा केला.
VIDEO
हे ही वाचा:
Code Name Tiranga : १०० रुपयांत पहा, परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात
बाय बाय कार्टून नेटवर्क! ३० वर्षांच्या मनोरंजक प्रवासानंतर कार्टून नेटवर्क लवकरच होणार बंद
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.