spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत बनवा खुसखुशीत खमंगअशी तांदळाच्या पिठाची चकली

दिवाळी म्हटले की डोळ्यांना समोर आधी येत फराळ. दिवाळी हा असा सण आहे की आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायाला मिळतात. तसेच दिवाळी हा सण घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतो. दिवाळीत आपण फराळ बनवतो पण फराळ बनवतांना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण फराळ बनवतांना एकादा फराळ फुटू देखील शकतो. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. फराळ बनवतांना आपण जे साहित्य वापरतो ते नीट आहे की नाही त्याची एक्सपायरी (expiry date) तर नाहीना गेली या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे. आपण जर (expiry date) गेलेल्या वस्तू वापरल्या तर फराळ खराब होण्याची शक्यता जास्त असते. आपण जे दिवाळीत फराळ बनवतो ते वर्ष भर टिकते. तर आज आम्ही तुम्हाला दिवाळीचे फराळ म्हणून खुसखुशीत चकली कशी बनवायची ही रेसिपी सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

 

खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही सुंदर, चकलीसुध्दा विविध पध्दतीने बनवता येते. चकली ही भाजणीच्या पिठापासून देखील बनवली जाते, तांदळाच्या पिठापासून , ज्वारीच्या पिठापासून देखील चकली बनवली जाते.

तांदळाच्या पिठापासून चकली बनवण्याचे साहित्य –

दोन वाट्या तांदूळ पीठ

हिंग

धने – जिरे पावडर १-१ चमचा

पाव वाटी लोणी

पांढरे तीळ

ओवा

चवीपुरते मीठ

अर्धा चमचा तिखट

 

तांदळाच्या पिठापासून चकली बनवण्याची कृती –

सर्व प्रथम तांदळाचे पीठ घेणे, आणि त्या पिठामध्ये हिंग, धने – जिरे पावडर, लोणी, पांढरे तीळ, ओवा, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा तिखट, आणि मिश्रण एकत्र करून पीठ चांगले मळून घेणे. पीठ चांगले मळून झाल्यानंतर पांढऱ्या कपड्यामध्ये १० मिनिटे बांधून ठेवणे. १० मिनिटे बांधून ठेवल्यानंतर पीठ कपड्यातून काढून घेणे आणि त्याचे मोठे गोळे बनवून घेणे. त्यानंतर गोळे बनवून झाल्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये तेल थोडे लावून घेणे ज्याणेकरून साच्या आत पीठ चिपकणार नाही. साच्यात तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये पिठाचे गोळे घालून घेणे आणि चकली पाडून घेणे. चकली तयार होईस पर्यंत तेल चांगले गरम करून घेणे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चकली चांगली तळून घेणे. तुमच्यासाठी खुसखुशीत चकली खाण्याकरिता तयार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिवाळीत बनवा पारंपरिक पद्धतीने अनारसे…

 

Latest Posts

Don't Miss