spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शी जिनपिंगची राजवट संपणार? शी जिनपिंगविरुद्ध चीनी जनतेने पुकारला बंड, कम्युनिस्ट राजवटीत लोकांचा विरोध…

शी जिनपिंग यांच्या विरोधात जनतेने अचानक आंदोलनं करायला सुरुवात केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या शेजारी असलेल्या चीनमध्ये अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य आहे.

आपला शेजारी देश चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात जनतेने अचानक आंदोलनं करायला सुरुवात केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या शेजारी असलेल्या चीनमध्ये अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य आहे. पर्यायी पक्ष नाहीत, निवडणूक यंत्रणाही तेथे नाहीत. त्यामुळे तेथे कम्युनिस्ट पक्षाचे लोक अनेक वर्ष आपले सरकार टिकवून आहेत. ही कम्युनिस्ट राजवट असल्याने याचा विरोध करणं कुणालाच शक्य नाही.

शी जिनपिंग यांचा पक्षात प्रभाव वाढल्याने त्यांनी त्यांच्या समर्थकांसह प्रमुख पदे भरली. तसेच, त्यांनी भ्रष्टाचारविरोधी सत्तेचा वापर करून विरोधकांना तोंडघशी पाडले. सध्याच्या वातावरणात शी जिनपिंग यांच्या विरोधात चिनी कम्युनिस्ट पक्षात कोणी नाही, असेही म्हणता येईल.

पण, तरीसुद्धा अशा परिस्थितीत शी जिनपिंग यांच्या विरोधात चीनमध्ये ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावून त्यांच्या राजवटीविरुद्ध निषेध व्यक्त केला जात आहे. अलीकडेच कुणीतरी चीनमध्ये ‘हुकूमशहा आणि देशद्रोही शी जिनपिंग यांना हटवा’ असे लिहिलेले बॅनर लावले होते. हे बॅनर कोणी लावले याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच शी जिनपिंग यांच्या विरोधातील संघर्षात जनतेने उडी घेतली आहे. चीनमध्ये अनेकांनी एकाच ठिकाणी एकत्र येऊन निषेध नोंदवला हे महत्त्वाचे मानले जात आहे.

कारण चीनमध्ये निषेध ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे! विशेषत: जेव्हा अशी उच्चस्तरीय बैठक होते तेव्हा तिला कमाल सुरक्षा असते. त्यापलीकडे जनतेने अचानक विरोधात उडी घेऊन मोठी खळबळ उडवली आहे. त्यानंतर हे आंदोलन सुरूच राहू नये आणि इतर ठिकाणी पसरू नये यासाठी पोलीस पावले उचलत आहेत.

दर ५ वर्षांनी होणारी कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय काँग्रेस ही चीनची मुख्य राजकीय घटना आहे. शी जिनपिंग यांनी परवा सुरू होणाऱ्या २० व्या काँग्रेसमध्ये नियम बदलून त्यांना आजीवन अध्यक्ष बनवणारी घटनादुरुस्ती सादर करण्याची अपेक्षा आहे. जवळपास १० वर्षे सत्तेत असलेले शी जिनपिंग हे तिथल्या सर्वात मजबूत नेत्यांपैकी एक आहेत. पण, चीनी जनतेचा हा विरोध पाहता शी जिनपिंग यांना कायमस्वरूपी चीनची सत्ता मिळणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

RRB Group D Answer key 2022: आरआरबी ग्रुप डी परीक्षेसाठी उद्यापासून नोंदवता येणार आक्षेप , इतकी भरावी लागेल फी

video viral : दीपिका पदुकोणने ‘छेल्लो’ शोच्या या अभिनेत्याला दिली किस, चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss