spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी तिखट शंकरपाळी

दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. दिवाळी ही शंकरपाळी सारखीच गोड असते. तसेच दिवाळी या सणाला ६ दिवसच बाकी आहे. दिवाळी म्हटले की फराळाचे पदार्थ आलेच. तसेच आपण दिवाळीत लाडू, चकली , चिवडा असे पदार्थ बनवतो. पण शंकरपाळी हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. शंकरपाळी मध्ये गोड आणि तिखट असे २ पदार्थ असतात. तसेच दिवाळीमध्ये शंकरपाळी हा ठरलेला पदार्थ असतो. मैदाच्या पिठाच्या गोड शंकरपाळी तर सर्वांना माहित आहे. तर या दिवाळीला बनवा तिखट शंकरपाळी… जाणून घ्या तिखट शंकरपाळी कशी बनवण्याची रेसिपी.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

 

शंकरपाळी ही दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला देखील चविष्ट असतात. शंकरपाळी अनेक प्रकारे बनवली जाते. जसे की रव्याचे, मैदयाचे, आणि बाजरीच्या पिठाचे देखील गोड शंकरपाळी बनवली जाते. त्याला कापण्या असे देखील म्हंटले जाते ते सुध्दा खुप चवीष्ट लागतात. शंकरपाळी सकाळी चहा सोबत खाण्याची मजाच वेगळी आहे.

शंकरपाळी बनवण्याचे साहित्य –

२ वाट्या गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ
दीड चमचा साखर
चिमूटभर हळद
मीठ
जिरे
तिखट
तळण्यासाठी तेल

 

शंकरपाळी बनवण्याची कृती –

सर्व प्रथम गव्हाचे पीठ घेणे. आणि त्या पिठामध्ये दीड चमचा साखर, चिमूटभर हळद, मीठ, जिरे, तिखट हे सर्व घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घेणे आणि चांगले पीठ मळून घेणे. पीठ मळून झाल्यानंतर त्याला ५ मिनिटे बाजूला ठेवणे. त्यानंतर तेल चांगले गरम करून घ्या, आणि एका बाजूला पीठ घेऊन त्याचे गोळे तयार करा आणि गोळे तयार झाल्यानंतर त्याला चांगले लाटून घ्या आणि कातणीने शंकरपाळ्या पाडून घ्या. शंकरपाळ्या तयार झाल्यानंतर तेलात चांगले टाळून घ्या. आणि गरम गरम शंकरपाळी खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : बहिण-भावाचं अतूट नाते दर्शवणारा सण ‘भाऊबीज’, जाणून घ्या पौराणिक कथा

 

Latest Posts

Don't Miss