spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता महाराष्ट्रात जनतेचे सरकार येणार, फडणवीसांचा दावा

नागपुरात दाखल होताच फडणवीसांनी जनतेशी संवाद साधला आहे.

नागपुर : महाराष्ट्रात भाजप- शिदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरात दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांचे भव्य स्वागत केले.

नागपुरात दाखल होताच फडणवीसांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्यात ते म्हणाले की, “आता महाराष्ट्रात जनतंचे सरकार येणार आहे. फडणवीस आणि शिंदेची जोडी आता मोकळा श्वास घेणार नाही याचा मी तुम्हाला विश्वास देतो. येत्या अडिच वर्षात शिंदे सरकारला कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खात्री बाळगू, पुढील पाच वर्षात देखील बहुमतांनी निवडूण येऊ”, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले.

ते म्हणाले, “राज्याच्या विदर्भाच्या विकासाबाबतही आश्वासन दिले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल” अशी विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा

नागपूरला रवाना होण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य येत नाही” असं म्हणत फडणवीसांनी ‘राज’कारण सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची तयारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून रॅली ते धरमपेठेतील येथील फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली आहे. याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित असून त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘कोण आला रे कोण आला.. महाराष्ट्राचा वाघ आला’, देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात आहे.

आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे संजय राऊत यांचे ट्विट

Latest Posts

Don't Miss