spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१५ ऑक्टोबरला पवारांचा पुन्हा एकदा नागपूर दौरा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) गेल्या आठवड्यात नागपुरात जाऊन आले होते . भटक्या-विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. पण शरद पवार हे विदर्भात राजकीय गणितं जुळवण्यासाठी ते आले असावे, अशीच चर्चा त्यावेळी होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) गेल्या आठवड्यात नागपुरात जाऊन आले होते . भटक्या-विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. पण शरद पवार हे विदर्भात राजकीय गणितं जुळवण्यासाठी ते आले असावे, अशीच चर्चा त्यावेळी होती.

आता शरद पवार पुन्हा शनिवारी १५ ऑक्टोबरला नागपूरला येणार आहेत. मूळ निवासी यांचे मूलभूत अधिकार या विषयावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित राहणार आहेत. बिरसा मुंडा ब्रिगेड व आदिवासी विचार मंचने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून शरद पवार विदर्भात नव्याने सोशल इंजिनिअरिंग करीत असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार यांची प्रत्येक कृती ठरवून आणि विचारपूर्वक असते. ते मागचा पुढचा विचार न करता सहसा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहात नाहीत. पंधरा दिवसांत ते नागपूरला दुसऱ्यांदा येत आहे. भाजपने पुणे जिल्हा घेरण्याचा सुरू केलेला प्रयत्न सुरू असल्याने पवार नागपूरकरांना इशारा देत असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

राष्ट्रवादीच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजपात अस्वस्थता (BJP) असल्याचं दिसतंय. याचे कारण म्हणजे, राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार पुन्हा एकदा नागपूरला येणार आहेत. सत्तांतरानंतर ते वारंवार विदर्भात राजकीय विणकाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आठवडाभरापूर्वीच शरद पवार नागपूरला आले होते. भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी कोल्हापूर संस्थानच्यावतीने शाहू शहाजी छत्रपती महाराज मानपत्र त्यांना देण्यात आले होते. भटक्या-विमुक्त समाजाला त्यांनी साद घालून पुन्हा संघर्षाच्या मशाली पेटवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर योगायोग असा झाला की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेलाही मशाल हेच चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. आता शरद पवार शनिवारी पुन्हा नागपुरात (Nagpur) येत आहेत. एका चर्चासत्रासाठी ते येथे येणार असले तरी, चर्चासत्र हे केवळ निमित्त आहे. खरे तर ते विदर्भाच्या राजकारणात (Vidarbha Politics) काहीतरी वेगळा प्रयोग करणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. या दरम्यान मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली होती. वेळ कमी असल्याने पुढील भेटीत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना दिले होते.

हे ही वाचा :

सामन्यांच्या खिशाला फटका; एसटीचा प्रवास महागणार

तुम्ही तरुणांची मने दूषित करत आहात, सुप्रीम कोर्टाने एकता कपूरला फटकारले

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss