Wednesday, October 2, 2024

Latest Posts

MNS Nagpur : मनसेची कार्यकारिणी रखडली विस्तारासाठी राज ठाकरेंना पदाधिकारीच सापडेनात!

दौऱ्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी पक्षाला अपेक्षित सक्षम आणि दमदार पदाधिकारीच सापडत नसल्याने नवीन कार्यकारिणी रखडली आहे.

आपल्या वेधडक बोलण्यासाठी आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंसमोर त्यांच्या याच स्वभावामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वी आगामी निवडणुकांच्या पार्श्भूमीवर राज  ठाकरेंनी नागपूर दौरा केला होता. दौऱ्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी पक्षाला अपेक्षित सक्षम आणि दमदार पदाधिकारीच सापडत नसल्याने नवीन कार्यकारिणी रखडली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या (MNS) पुनर्बांधणीसाठी हा दौरा केला होता. यावेळी त्यांनी तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा समाचार घेत १७ वर्षात पक्ष का वाढला नाही? असा सवाल करत नागपूर आणि शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती.

आता नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या तारखेनुसार मुंबईला राज ठाकरेंनी एक बैठक घेतली. यात नागपूर शहरात दोन अध्यक्ष आणि ग्रामीणमध्ये एक अशा तीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती आहे. नवरात्रीत या सर्व घडामोडी घडल्याची माहिती आहे. दसरा आटोपल्यानंतर नागपूरमधील कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे ठरवण्यात आले होते. शहरात विशाल बडगे यांना तीन तर चंदू लाडे यांना प्रत्येकी तीन मतदार संघाचे (Constituency) अध्यक्ष करण्यात आले असल्याचंही कळतंय. ग्रामीणमध्ये (Nagpur Rural) आदित्य दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे फक्त दोनच मतदारसंघ सोपवण्यात आले.मात्र एकमत होत नसल्यामुळे उर्वरित चार मतदारसंघाला सध्या अध्यक्षच नाही, अशी माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता त्यांचे विश्वासू संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि अविनाश जाधव (Avinash Jadhav) येत्या चार-पाच दिवसात नागपूरला येणार आहेत आणि याच काळात ते शहर आणि ग्रामीण उर्वरित कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही बोलले जात आहे. मनसे नागपूर आणि विदर्भात पक्षाच्या वाढीसाठी पात्र असे मोजकेच सक्षम कार्यकर्ते आहेत. तर सक्षम नेतृत्व सापडत नसल्यामुळे मनसेला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पण, या समस्येवर लवकरच काहीतरी तोडगा निघेल असा विश्वास मनसे नेत्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

… मला राजकारणात यायला आवडले नसते; राज ठाकरेंच्या पुत्राचे खळबळजनक वक्तव्य

उद्या समता पार्टी हायकोर्टात मांडणार आपली बाजू; उद्धव ठाकरेंची मशाल धोक्यात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss