spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

G. N. Saibaba : प्रा. साईबाबांच्या निर्दोष सुटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (G.N. Saibaba) यांची मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (G.N. Saibaba) यांची मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. याच उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात राज्य सरकारनं (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागितली आहे.

तर या सर्व प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी हा निर्णय निराशाजनक असल्याचं सांगितले आहे. जी.एन. साईबाबा यांना निर्दोष मुक्तता करणं हा न्यायालयाचा निर्णय निराशजनक आहे. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. फक्त युपीए कायद्याअंतर्गत कारवाई संदर्भात शासनाची परवानगी काहीशी उशीर आली, एवढ्या तांत्रिक मुद्द्यावर अशा व्यक्तीला सोडून देणं, ज्याच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. हे अत्यंत निराशाजनक असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

प्रा. साईबाबाप्रकरणी (Gokarakonda Naga Saibaba) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमधून काल हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. शुक्रवारीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यांना अपील करण्यास परवानगी देण्यात आली, तसेच २०१७ मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली इथल्या सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. मे २०१४ मध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली साईबाबा यांना अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

जी. एन. साईबाबा दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. वर्ष २०१३ मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या काहीजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबा हा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर गडचिरोली मध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबाच्या घरात झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे गोळा केले होते. त्यानंतर साईबाबाला अटक केली होती.

साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांचे आरोप होते. साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हे ही वाचा :

G. N. Saibaba : अखेर प्रा. जी. एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता; कोर्ट म्हणाले…

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिला असुरक्षित ?

भाजपला एकनाथ शिंदे सुद्धा नको; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss