spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Womens Asia Cup 2022: नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात (Sri Lanka Women vs India Womens) आज महिला आशिया चषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. या हंगामात भारतीय महिलांनी फक्त एक सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या गट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. आता अंतिम सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा करण्याच्या इराद्यानं संघ मैदानात उतरणार आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) रंगणाऱ्या या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडून विशेष आशा असतील. जेमिमा या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिनं पाच डावात २१५ धावा केल्या आहेत. तर, या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत शेफाली वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिनं पाच डावात १६१ धावा केल्या आहेत. स्मृती सलामीवीर म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यामुळं तिच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकतो. श्रीलंकेसाठी रेणुका सिंह टाकत असलेले चौथे षटक एक वाईट स्वप्नासारखे ठरले. या षटकात लंकेने तब्बल तीन विकेट्स गमावल्या. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली १ धावेवर बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी २ धावांची भर घालून धावबाद झाली. रेणुकाने पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था बिनबाद ८ वरून ४ बाद ९ अशी केली. यानंतर रेणुकाने सहाव्या षटकात कविशा दिलहारीचा १ धावेवर त्रिफळा उडवला. यामुळे लंकेची अवस्था ५ बाद १६ धावा अशी झाली.

महिला टी२० आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर ती सर्वोत्तम होती. पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा ३० धावांनी नमवलं. यानंतर यूएईवर मोठा विजय नोंदवत त्यांचा १०४ धावांनी पराभव केला. मात्र, भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर बांगलादेश आणि थायलंडचा पराभव करत भारतानं स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या उपांत्य फेरीत भारतानं थायलंडचा ७४ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक दिली.

हे ही वाचा :

जीएन साईबाबांच्या सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Diwali 2022 : दिवाळीत दिवे लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss