spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्षाची घेणार भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्षाची घेणार भेट

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. या नंतर ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर दालनास भेट देणार आहेत.

त्याच बरोबर गेले दोन दिवस राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा : 

आता महाराष्ट्रात जनतेचे सरकार येणार, फडणवीसांचा दावा

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. व वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा

Latest Posts

Don't Miss