spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray : मनसे अध्य्क्ष राज ठाकरे ‘वर्षा’ वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी आज (१५ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी आज (१५ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी ३ वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. वर्षा बंगल्यावरील या भेटीला एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय चर्चा होणार हे साहजिक आहेत. शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेले संत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरु असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा होईल असा तर्क आहे. आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत त्यांच्यात चर्चा होते का, चर्चा झालीच तर त्याचा तपशील काय याची उत्सुकता लागली आहे.

साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा होणार नाही, असं होऊ शकणार नाही. आरोग्यविषयक चर्चेसोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा :

Diwali 2022 : दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन

Womens Asia Cup 2022: नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss