spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

APJ Abdul Kalam Birthday: आज एपीजे अब्दुल कलाम जयंती, वाचा भारताने मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

१५ ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिनही साजरा केला जातो.हा दिवस डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

आज मिसाइलमन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आहे.भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १५ ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिनही साजरा केला जातो.हा दिवस डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.कलाम यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या अतुलनीय योगदानाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी खूप काही केले.१५ ऑक्टोबर २०१० रोजी, संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी १५ ऑक्टोबर हा एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.डॉ.कलाम यांचे संपूर्ण जीवन हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की, संकल्प केला तर कोणताही मार्ग अवघड नाही आणि कोणतेही ध्येय अभेद्य नाही.कलाम यांनी भारताचा अवकाश कार्यक्रम नव्या उंचीवर नेला.त्यांनी संरक्षण क्षेत्रातही उत्कृष्ट योगदान दिले आहे, त्यामुळेच आज संपूर्ण देश त्यांना मिसाइल मॅन म्हणून ओळखतो.

१५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे जन्मलेल्या डॉ. कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम होते.२००२ ते २००७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.या काळात ते जनतेचे अध्यक्ष म्हणून खूप लोकप्रिय झाले.अब्दुल कलाम यांचा जन्म एका कोळ्याच्या घरात झाला.वृत्तपत्रे विकून शिक्षण घेतलेले कलाम जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले.

एपीजे अब्दुल कलाम आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.वाचा कलाम साहेबांचे काही प्रेरणादायी विचार-

  • आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
  • “स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.”
  • या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे,ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
  • “स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते आहे जे आपल्याला झोपू देत नाही.”
  • “जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील.”
  • मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
  • “वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते, जितके प्रयत्न करण्यांनी शिल्लक ठेवलेले असते.”

  • “विज्ञान मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे, आपण ते खराब करू नये.”
  • जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
  • “राष्ट्र लोकापासून बनलेले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी राष्ट्राला हवे ते मिळवणे शक्य आहे.”

हे ही वाचा:

Womens Asia Cup 2022: भारतीय महिलांनी सातव्यांदा जिंकला आशिया चषक

जीएन साईबाबांच्या सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss