spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत दिवे का लावले जातात ? जाणून घ्या महत्व

दिवाळी या सणाला ५ दिवसच बाकी आहे. तसेच दिवाळी हा सण (२१ ऑक्टोबर) पासून सुरु होत आहे. दिवाळी या सणामध्ये आपण पणत्या, कपडे , रांगोळी , अशी खरेदी करतो. आणि ही खरेदी आपण आनंदाने आणि उत्साहाने करतो. दिवाळी म्हटले की आपण अंगणात रांगोळी काढतो आणि दिवे लावून पूर्ण रोषणाई करतो. दिवाळीचे वातावरण हे अगदी सुख – समृद्धीचे वाटे. तसेच आपण दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे फराळ देखील करतो. तसेच दिवाळी मध्ये दिवे लावण्याची प्रथा आहे. दिवे का लावतात ? दिवे कसे लावावे ? दिवे लावणे शुभ मानले जाते का ? असे प्रश्न तुम्हाला नक्की पडत असतील. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दिवे का लावतात या बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : यंदा दिवाळी मध्ये धमाकेदार ऑफर, घ्या स्वस्तात कार

 

दिवाळी हा सण भारता मधील बाकी सणांमधील एक महत्वाचा सण आहे. दिवाळीत दिवे लावून घरात रोषणाई करावी ही प्रथा आहे. तसेच आपण दिवाळी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे खरेदी करतो. जसे की मातीचे दिवे , वेगवेगळ्या रंगाचे दिवे अनेक प्रकारचे दिव्यांवर वर्क केले दिवे. असे प्रकारचे दिवे आपल्याला मार्केट मध्ये खरेदी करतांना दिसतात.

दिवाळीत दिवे का लावतात ? –

दिवाळी मध्ये दिव्यांचे अतुट नाते असते. दिवाळी या सणाला प्रकाशाचे महत्व आहे. दिव्याची ज्योत आपल्याला जीवनात नेहमी जळत राहण्याची म्हणजेच काहीतरी करत राहण्याची प्रेरणा देते. दिवाळी मध्ये दिवे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. दिवाळी दिवे लावणे शुभ मानले जाते. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येत असते जेव्हा सर्वत्र काळोख पसरलेला असतो तेव्हा या काळोखाला दिव्याची एक छोटीशी ज्योत दूर करते. घरात काळोख नसावा यासाठी दिवे लावले जाते. दिवे लावल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो असे देखील बोले जाते. दिवाळीच्या रात्री म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या रात्री घराच्या गच्चीवर दिवे ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही, असे देखील मानतात. दिव्याची ज्योत पेटवल्यानंतर ती विझवणे हे अशुभ मानले जाते दिव्यांची ज्योत पूर्व दिशेने ठेवल्यास दीर्घायुष्य मिळते. दक्षिण दिशेने ठेवल्यास हानी होते. पश्चिम दिशेकडे ठेवल्यास दुखः मिळते, तर उत्तर दिशेकडे ठेवल्याने धन, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. म्हणून दिवाळीत दिवे लावावे.

हे ही वाचा :

T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुसरा धोनी मिळाला, सुरेश रैनाने ‘या’ खेळाडूकडे बोट दाखवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss