spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BJP Diwali : दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची हवा, यंदाची दिवाळी जोरात विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं

अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवरुन आता शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि शिंद गटांत सामना रंगला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवार ऋुतुजा लटके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजपा आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय.

“त्यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली. आता दक्षिण मुंबईतही भाजपाचाच खासदार जिंकून येणार असं नारायण राणे यांनी म्हटलं यांनी त्यांचा पत्रकार परिषदेतून म्हटले आहे. अशीच काहीच चिन्ह दिसून येत आहे. मुंबईतील मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने लागबाग, परळ तसेच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळी आदी भागांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दहीहंडी आणि नवरात्रौत्सवातील मराठी दांडियानंतर आता दिवाळीमध्येही भाजपाकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : 

Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर आता भाजपातर्फे दिवाळीही जोरात साजरी केली जाणार आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘ मराठमोळी वेशभूषा’ स्पर्धा आणि मराठमोळा दीपोत्सव आयोजित होणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपानं मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने मराठी कट्टा हा पक्षाकडून उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचसोबत दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. यंदा प्रथमच भाजपाकडून काळाचौकी परिसरात मराठी दांडिया आयोजित केला होता. लालबाग, परळी, शिवडी या भागात मराठी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे या परिसरात भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत.

Manava Naik : “रुक तेरेको देखता हूँ…” त्याने मला धमकावलं…”, मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग

वरळीत ठाकरेंचं वर्चस्व

वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहे. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. तर वरळी परिसरातच राहणारे सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. या परिसरातील खासदार शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा याच परिसरातील आहेत. शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक वरळीतच राहतात. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाचं वर्चस्व आहे.

Sushma Andhare : ‘सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा’ शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची खोचक टीका

Latest Posts

Don't Miss