spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Food Day 2022: आज जागतिक अन्न दिन, का साजरा केला जातो जागतिक अन्न दिन?

या दिवशी ठिकठिकाणी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम साजरे केले जातात.

आज जागतिक अन्न दिन आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जागतिक भुकेचा सामना करणे आणि संपूर्ण जगातून ती दूर करणे हा आहे. जेणेकरून कोणीही उपाशी व कुपोषित राहणार नाही. कुपोषणामुळे दरवर्षी लाखो-करोडो लोकांचा जीव जातो, अशा परिस्थितीत जागतिक अन्न दिनानिमित्त लोकांना जागरुक केले पाहिजे.

१५० सदस्य देश एकत्र हा दिवस साजरा करतात

जगभरातील संयुक्त राष्ट्रांचे १५० सदस्य देश एकत्रितपणे जागतिक अन्न दिन साजरा करतात. या दिवशी ठिकठिकाणी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. जेणेकरून जगातून भूक नाहीशी होईल. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एक वेळची भाकरीही मिळत नाही. योग्य आहाराअभावी त्यांना अनेक प्रकारे कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.

हा दिवस कधी सुरू झाला

अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे १९४५ मध्ये रोममध्ये प्रथम या दिवसाची स्थापना करण्यात आली.

या वर्षाची थीम

दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी नवीन थीम निवडली जाते. या वर्षीची थीम कोणालाही मागे सोडू नका (Leave no one behind) ही आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ अहवाल

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये चीन, बेलारूस, तुर्की, चिली, क्रोएशिया, एस्टोनिया, हंगेरी आणि कुवेतसह १७ देश आघाडीवर आहेत. या देशांचे गुण 5 पेक्षा कमी आहेत आणि त्यांना १-१७ च्या दरम्यान क्रमांक दिलेला नाही. त्याच वेळी, 121 देशांच्या यादीत, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, मादागास्कर, काँगो, चाड आणि येमेन (१२१ वे स्थान) मागे आहेत.

वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) नुसार, कोविड-१९ महामारीच्या आधी, २०१९ मध्ये, जगातील १३५ दशलक्ष लोक गंभीर अन्न संकटाचा सामना करत होते. या वर्षाच्या सुरूवातीस, त्यांची संख्या २८२ दशलक्ष झाली आणि आज ८२ देशांमधील ३४५ दशलक्ष लोक तीव्र अन्न संकटाचा सामना करत आहेत. अन्न आणि कृषी संघटने (FAO) च्या मते, २०२१ मध्ये पाच लाख लोक उपासमारीने मरण पावले. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, दरवर्षी १० पैकी एक व्यक्ती दूषित अन्नामुळे आजारी पडते. दूषित अन्नामुळे दरवर्षी ४.२० मृत्यू होतात. हे संकट प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. यात दरवर्षी १.२५ लाख मुलांचा मृत्यू होतो.

हे ही वाचा:

Global Hunger Index 2022: ‘देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’, ग्लोबल हंगर रिपोर्टला भारत सरकारचा प्रतिसाद

Global Hunger Index 2022: हंगर इंडेक्स व्यतिरिक्त, या बाबींमध्ये सातत्याने घसरतेय भारताची रँकिंग, ही आहे संपूर्ण यादी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss