spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यावर संकटाचे ढग, सामना होणार का रद्द?

हा सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे. पण काही कारणांमुळे हा सामना होण्याची शक्यता काहीशी धूसर झाली आहे.

T20 World Cup सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. विश्वचषकातील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तमाम क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे. पण काही कारणांमुळे हा सामना होण्याची शक्यता काहीशी धूसर झाली आहे.

पाऊस करू शकतो हस्तक्षेप

विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पण २३ ऑक्टोबरला मेलबर्नमधील पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये २० ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम क्रिकेटप्रेमींची निराशा होऊ शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २३ ऑक्टोबर रोजी पावसाची ६०% शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमान १२ अंशांवर जाण्याचा अंदाज असून कमाल तापमान १९ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी चाहत्यांची झाली निराशा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या आशिया चषकात दोन्ही संघांमध्ये सामना रंगला होता. दोन्ही संघांनी एकूण दोन सामने खेळले. त्यापैकी एक सामना भारताने तर एक सामना पाकिस्तानने जिंकला होता. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय चाहते वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत हवामानाचा असा मूड करोडो चाहत्यांची मने तोडू शकतो. गेल्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महान सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

T20 मध्ये कसे आहेत हेड टू हेड आकडे ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ११ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ८ सामने भारताने जिंकले आहेत. तर ३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. मात्र, T20 मध्ये भारताचे वर्चस्व आहे. पण गेल्या विश्वचषकातील पराभवामुळे भारत पाकिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

हे ही वाचा:

T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दुसरा धोनी मिळाला, सुरेश रैनाने ‘या’ खेळाडूकडे बोट दाखवले

T20 World Cup In Marathi : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरेंना भेटणार ‘स्टार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss